Abhay Deol | एकेकाळी कपूर घराण्यातील महिलांना चित्रपटात काम करण्यास बंदी होती, त्याचप्रमाणे देओल कुटुंबातील महिलांनाही चित्रपटसृष्टीत कोणी पाहिलं नाही. धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल हे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबातून हेमा मालिनी, ईशा आणि आहाना यांना सोडून चित्रपटसृष्टीत त्यांच्या घरातील कोणतीही महिला ही दिसली नाही.
याबाबत धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओलनं ‘फिल्मफेयर’ला दिलेल्या मुलाखतीत देओल कुटुंबातील मुली आणि सुनांनी चित्रपटसृष्टीत काम न करण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यानं यावेळी हे देखील मान्य केलं की हे जुन्या विचारांचे आहेत. अभय देओलने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. Abhay Deol |
तो म्हणाला की, “आमचं एकत्र कुटुंब होतं आणि त्यात आम्ही सात मुलं होतो. चित्रपट अशी गोष्ट आहे ज्याविषयी मला लहानपणापासूनच माहित होतं. माझे वडील आणि काका चित्रपटांमध्ये होते. ते सर्वसामान्य कुटुंबातून आले होते. ते एका गावात राहणारे आहेत आणि त्यांच्यासाठी हे मोठं शहर आणि ग्लॅमरचं जग थोडं वेगळं होतं. त्यांच्या कुटुंबाला लहान-शहरातील मूल्येही जपायची होती. या कारणास्तव कुटुंबातील मुलांना कधीही चित्रपट पार्ट्यांमध्ये जाण्याची किंवा इतर स्टार मुलांशी संवाद साधण्याची परवानगी नव्हती.”
अभय देओल पुढे म्हणाले, “आम्हाला चित्रपट पार्ट्यांमध्ये जाण्यापासून का रोखले गेले हे मला समजले नाही. त्याला इंडस्ट्रीतील मुलांमध्ये मिसळू दिले नाही. ते आमचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यावेळी मला काहीच समजले नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य लहान शहरांतील असल्याने आणि त्यांची मूल्ये तिथूनच असल्याने मुलांनी चकचकीत आणि प्रसिद्धीपासून दूर राहावे अशी त्यांची इच्छा होती. वडिलांना माझा मनोरमा हा चित्रपट अजिबात आवडला नव्हता.” Abhay Deol |
त्यानंतर अभयने घरातील महिलांबद्दल सांगितले की, त्यांना काम करण्याची परवानगी आहे, पण चित्रपटात नाही. सनी देओलची पत्नी लिंडा, बॉबी देओलची पत्नी तान्या आणि धर्मेंद्रची पहिली पत्नी आणि दोन्ही मुली नेहमीच चित्रपटांपासून दूर राहिले आहेत, असे अभयने देओल कुटुंबातील मोठा खुलासा केला आहे.
हेही वाचा: