पुणे – जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला एजंटने स्वत: जिल्हाधिकारी व तहसिलदार असल्याचे सांगत अनेकांना लाखोचा गंडा घातला आहे. संबंधीत महिलेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतही वावर असल्याने तेथेही तीने गंडा घातल्याची शक्यता आहे. या महिलेविरुध्द आजपर्यंत पाच ते सहा जण तक्रारी करण्यास पुढे आले असून त्यांची 50 ते 60 लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत आहे. या महिलेस येरवडा पोलिसांन एका गुन्हयात अटक केली आहे.
याप्रकरणी येरवडा परिसरातील प्रतिकनगर येथील उत्तम टाऊन स्केप या सोसायटीत राहणाऱ्या दुर्गेश्वरी अशोक चित्तर(46) व त्यांचे पती अशोक चित्तर(47) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचेच सोसायटीत भाडयाने राहणाऱ्या महिलेने अपंगांसाठी शासकिय भुखंड मिळवुन देण्याचे आमिष त्यांना दाखवले होते. त्यांची 27 लाख 50 हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी दुर्गेश्वरी चित्तर यांनी दि 21 जूलै रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांचे आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उप निरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस हवालदार दत्ता शिंदे,पोलीस नाईक गणेश वाघ, विठ्ठल खेडकर, पार्वती भंडारी, राजेंद्र ढोणे, वर्षा सावंत यांनी दाखल गुन्हयातील आरोपी महिला शोध घेतला असता ती तीचे राहते घरात मिळुन आल्याने तीचे राहते घराची झडती घेतली असता घरात बनावट शिक्के, बनावट कागदपत्र तसेच काही लोकांना नोकरीस लावण्याकरिता तयार केलेले बनावट कागदपत्र मिळुन आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेण्यात आले आहेत. तीस अटक करण्यात आले असुन न्यायालयाने आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. महिला आरोपीने अशा अनेक लोकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न होत आहे. ज्यांची फसवणुक झाली असेल त्यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उप आयुक्त पकंज देशमुख , सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख , पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, उप-निरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार गणेश वाघ, विठ्ठल खेडकर, पार्वती भंडारी, राजेंद्र ढोणे, वर्षा सावंत यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक हनुमंत भोसले