वृत्तसंस्था – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळविल्यानंतर तेथील जनतेमध्ये गोंधळ उडाला आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी तेथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विमानतळावर गर्दी केली होती. त्यावेळी विमानतळावरुन विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान यावेळी काही महिलांनी विमानतळावर प्रवेश मिळावा यासाठी जवानांकडे मदत मागितली होती. त्या आक्रोशाचा व्हि़डिओ समोर आला आहे.
Afghan families behind the barbed wires of Kabul airport, begging soldiers to let them in. "Help us, the Taliban are coming for us," the woman cries.#Afghanistan pic.twitter.com/aCe6vgmshi
— Farnaz Fassihi (@farnazfassihi) August 18, 2021
या व्हिडिओमध्ये आम्हाला वाचवा, तालिबानी आमच्यासाठी येत आहेत अशी विनंती महिलांनी अमेरिकन सैन्याकडे केली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
सध्या संपूर्ण जगाच्या नजरा अफगाणिस्तानवर आहेत. तालिबानी राजवट परत येताच लोकांनी देश सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काबूल विमानतळाची स्थिती अत्यंत वाईट आहे. इथं खूप गर्दी होत आहे. अनेक उड्डाणं निलंबित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर विमानतळावर झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यूही झाला आहे.
येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अफगाणांच्या गर्दीमुळे परिस्थिती इतकी बिकट झाली की, जमावाला पांगवण्यासाठी, विमानतळाची काळजी घेत असलेल्या अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला होता. अमेरिकेने काबुल विमानतळावर नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी 6,000 सैनिक तैनात केले आहेत. सीमा बंद झाल्यानंतर विमानतळावर लोकांची गर्दी जमली आहे.