#NZvIND : दुसऱ्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर भारताचा न्यूझीलंड संघाकडून पराभव

-महिलांनी टी-20 मालिका गमावली
-जेमीमाची अर्धशतकी खेळी व्यर्थ

ऑकलंड, दि. 8 – अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी एका धावेची गरज होती. मात्र, भारतीय महिलांना ती धाव अडवता न आल्याने भारताने दुसऱ्या सह तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अश्‍या फरकाने गमावली आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 135 धावांची मजल मारत न्यूझीलंदसमोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने हे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर सहा गड्यांच्या मोबदल्यात 136 धावा करत पुर्ण करत दुसरा सामना आपल्या नावे केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताकडून 136 धावांचे माफक आव्हान मिळेलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. सलमीवीर सोफी डेव्हिन आणि सुझी बेल्ट यांनी 5 षटकांत 33 धावांची सलामी दिली. राधा यादवने सोफीला 19 धावांवर बाद करत न्यूझीलंदला पहिला धक्‍का दिला. त्यानंतर कॅटलिन गुरेला 4 धावांवर बाद करत राधा यदवने त्यांना दुसरा धक्का दिला.

चांगल्या सुरुवातीनंतर दोन फलंदाज लागोपाठ बाद झाल्यानंतर सलामीवीर सुझी बेटस आणि कर्णधार सॅटर्थवेट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागिदारी रचत न्यूझीलंडला 100 धावांच्या पुढे पोहचवले. दरम्यान, सुझीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

पुनम यादवने सॅटर्थवेटला 23 धावांवर बाद करत ही जमलेली जोडी फोडली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्यांना एक एक धाव घेण्यासाठी झगडायला लावले. यात गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे भारताने सामना अखरच्या षटकापर्यंत नेला. पण, अखेरच्या षटकात फलंदाजीला आलेल्या हानाने अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेतली.

तत्पूर्वी, भारतीय महिला संघाच्या स्मृती मानधनाने याही सामन्यातही भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. तर, नवख्या प्रिया पुनियाने याही सामन्यात निराशा केली. पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात ती अवघ्या 4 धावा करुन बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधनाने त्यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागिदारी रचली. भारताने 10 व्या षटकांत 71 धावांवर पोहलचा असताना स्मृती 36 धावांवर बाद झाली.

स्मृती बाद झाल्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर चांगल्या धावगतीचा फायदा उठवण्यासाठी वरच्या क्रमांकावर खेळण्यास आली. पण, तिला कॅसपेर्कने अवघ्या 5 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. कर्णधार बाद झाल्यानंतर रॉड्रिग्जने एकाकी झुंज देत भारताची शंभरी पार करुन दिली. तिने आपले अर्धशतक पूर्ण केले.

रॉड्रिग्जने 53 चेंडूत 72 धावांची खेळी केली. पण, भारताच्या एकाही फलंदाजाने तिला साथ दिली नाही. स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदजांना साधी दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यामुळे भारताला दमदार सुरुवातीनंतरही 136 धावांपर्यंतच मजल मारता आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)