#NZvIND : अंतिम सामन्यात पराभव टाळण्याचे भारतीय महिलांसमोर आव्हान

न्यूझीलंड विरुद्ध भारत महिल टी-20 क्रिकेट मालिका

स्थळ – हॅमिल्टन
वेळ – स. 7.30 वा

हॅमिल्टन – तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावल्याने मालिका 2-0 अशा फरकाने गमावल्यानंतर अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान भारतीय महिला संघासमोर आज असणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेते भारताने न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला होता. तर, टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यने चांगल्या सुरूवाती नंतरही भारतीय संघाला विजय मिळवण्यात अपयश आले होते.

त्यातल्या त्यात पहिल्या दोन्ही सामन्यात संघातील स्मृती मंधना आणि जेमीमा रॉड्रीक्‍झ वगळता इतर फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीकाव धरता आला नव्हता त्यामुळे भारताला मालिका गमवावी लागली होती. त्यातल्या त्यात भारताची एकदिवसीय सामन्यांमधिल कर्णधार मिताली राजला दोन्ही सामन्यात संघा बाहेर बसवल्यानंतर टीका सहन करावी लागत असलेल्या हरमनप्रीत सिंग अखेरच्या सामन्यात तरी मितालीला संघात समाविष्ट करेल की नाही याची शंका आहे.

तर, मंधनाच्या जागी सलामीवीर म्हणुन संधी मिळालेल्या प्रिया पुनीयाने दोन्ही सामन्यात प्रत्येकी 4 धावांची खेळी करत मिळालेली संधी घालवली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात प्रियाच्या जागी मितालीला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. तर, चौथ्या स्थानी आलेल्या दयालान हेमलथालादेखील फारशी चमक दाखवता आली नाही. युवा खेळाडूंचा फॉर्म पाहता संघ व्यवस्थापन मिताली राजला आजच्या सामन्यामध्ये संधी देते का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

संभाव्य संघ

भारत : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, मिताली राज, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिस्त, दयालन हेमलता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, प्रिया पुनिया.

न्यूझीलंड : ऍमी सॅटर्थवेट, सुझी बेट्‌स, बेर्नाडीन बेझुइडेनहौट, सोफी डेव्हिन, हॅलीय जेन्सन, कैटलीन ज्युरी, लेघ कॅस्पेरेक, ऍमेलीया केर, फ्रान्सेस मकाय, कॅटी मार्टिन, रोसमॅरी मेर, हॅन्नाह रोव, ली ताहूहू.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)