पुणे – पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी अहवाल अनुकुल आणि लवकरात लवकर पाठविण्यासाठी पती, पत्नीकडून प्रत्येकी पाचशे रुपये लाच मागणाऱ्या महिला पोलीस शिपायाला आपली नोकरी गमविण्याची पाळी आली आहे विभागीय चौकशीत त्या दोषी ठरल्याने अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे यांनी शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे तसा आदेश त्यांनी आज काढला पोलीस शिपाई प्रियंका वाघ असे तिचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, हा प्रकार 30 जुलै 2017 रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात घडला होता तक्रारदार आणि त्यांची पत्नी पासपोर्टच्या चारित्र्य पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात गेले होते त्यावेळी प्रियंका वाघ यांना पासपोर्ट पडताळणी कामकाजास मदतनीस म्हणून नेमणूक होती. त्यांनी या दोघांची कागदपत्रे तपासले त्यानंतर त्यांच्याकडे प्रत्येकी पाचशे रुपये अशी एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनी याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात आली त्यात त्या दोषी असल्याचे सिद्ध झाले. विभागीय चौकशीतील निष्कर्षानुसार त्यांना शासकीय नोकरीतून काढून टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांना अपर पोलीस आयुक्तांनी बडतर्फ करण्याचा आदेश काढला आहे