डावखोरी असल्यामुळे पती अन् सासुकडून विवाहितेचा छळ

पुणे – पत्नी डावखुरी असल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने आणि त्याच्या आईने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर उजव्या हातानेच काम करायचे असे म्हणत दमदाटीही केली. त्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचेही पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर वानवडी पोलिसांनी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेचा 27 फेब्रुवारी 2020 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर ती वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेवाळेवाडी फाटा येथे पतीसोबत राहू लागली. दरम्यान विवाहानंतर पतीला आणि सासूला ही महिला डावखुरी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली.

तू डावखुरी आहेस, उजव्या हातानेच काम कर असे म्हणत वारंवार तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच माहेरून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठीही तिला त्रास दिला आणि मारहाणही करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंढरकर करीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.