भोर नगरपालिकेवर महिलांचाच झेंडा

भोर -भोर नगर पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापदी पदासाठी नुकतीच आमदार संग्राम थोपटे यांचे मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. सर्व समित्यांवर महिलांना संधी मिळल्याने भारे नगरपालिकेवर उपनगराध्यक्ष वगळता महिलाराज आले आहे.

या निवडणुकीत आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी आशा बजरंग शिंदे, बांधकाम सभापती पदी अमृता राजेंद्र बहिरट, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी वृषाली अंकुश घोरपडे, शिक्षण व नियोजन समितीच्या सभापती पदी रुपाली रविंद्र कांबळे, तर महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदी स्नेहा शांताराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली. भोर ही एक आदर्श नगरपालिका असून, या नगर पालिकेने भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नुकतेच 6 कोटी 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.

महाराष्ट्र शासनाने नगरपालिकेस गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. भोर नगर पालिकेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून नगराध्यक्षपद हे महिलांच्याच हाती असून निर्मला आवारे या नगरपालिकेचा कारभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. आता भोर नगर पालिकेच्या चारही विषय समिती सभापती पदी महिलांनाच संधी दिल्याने भोर नगरपालिकेवर खऱ्या अर्थाने महिलाराज प्रस्थापित झाले आहे. आमदार संग्राम थोपटे यांचे नेतृत्वाखाली भोर नगर पालिकेचा झेंडा महिलांच्या हाती दिल्याने नगर पालिकेचा हा आदर्श राज्यातील नगर पालिकांसाठी प्रेरणा देणारा असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत पिठासन अधिकारी म्हणून भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी काम पाहिले. या वेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, गटनेते सचिन हर्णसकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×