पिंपरीत कचरा वेचक महिलेची आत्महत्या

पिंपरी: राहत्या घरी कचरा वेचक महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी आठच्या सुमारास पिंपरी मधील रमाबाई नगर येथे घडली.

संगीता बाळू गाडे (वय 40, रा. रमाबाई नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संगीता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करत होत्या. त्यांनी राहत्या घरी खांबाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

ही घटना सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. संगीता यांच्या मुलाने त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.