नाशिक : महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना नोटीस

नाशिक – येवला येथील प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करत तक्रर दाखल केली आहे. या घटनेमुळे महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रांताधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली असून यासंदर्भात खुलासा मागविला आहे.

सोपान कासार असे प्रांताधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या विरोधात येवला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिला तलाठ्याच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच, दमदाटी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

बदलीस पात्र नसतानाही ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केली यांसह विनयभंगाचे त्यांच्यावर आरोप करून बदलीविरोधात पीडित महिला तलाठ्याने मॅटमध्ये धाव घेतली होती. २३ ऑगस्टपर्यंत मॅटने स्थगिती दिली.

दरम्यान, त्या महिलेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडेही तक्रार केली होती. येवला पोलिसात याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे यांनी विशाखा समितीकडून याविषयी अहवाल मागविला. त्यानंतर विशाखा समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.