बंगळुरू : श्वसनाला त्रास होत असलेल्या महिलेवर उपचार करण्यास तब्बल 12 रुग्णालयांनी नकार दिल्याने अखेर त्या महिलेचा तडफडून मृत्यू झाला. बंगळुरू येथे ही घटना घडली. या महिलेचे पती बाबू यांनी या भयानक प्रकाराला सोमवारी वाचा फोडली.
ते म्हणाले, व्हिक्टोरिया रुग्णालयासह खासगी रुग्णालये मिळून 12 ठिकाणी तीन दिवसांत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र बेड खाली नसल्याचे सांगत या महिलेला सर्वांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. तिचा अखेर केसी रुग्णालयात दाखल करून झाल्यावर थोड्याच वेळात मृत्यू झाला.
दुसरा मृत्यू
ताप आल्याने दाखल करून घेण्यास अनेक रुग्णालयांनी नकार दिल्याने एका 35 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. मंजूनाथ असे त्याचे नाव आहे. मात्र महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह नेण्यास नकार दिला. घरातच मृतदेह ठेवल्याने स्थानिक नागरिकांत घबराट पसरली आहे.