पिंपरी – कामानिमित्त पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री भोसरी येथे घडली. रवींद्र शिवाजी पोमण (वय 57, रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने मंगळवारी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास पीडित महिला आपल्या कंपनीच्या कामानिमित्त भोसरी पोलीस ठाण्यात आली होती. तिने तिची कार पोलीस ठाण्याच्या बाहेर व्हिजिटर पार्किंगमध्ये पार्क केली. तेथून त्या पोलीस ठाण्यात येत होत्या. त्यावेळी तिच्या ओळखीच्या आरोपी रवींद्र पोमण हा तिला भेटला. त्याने फिर्यादी यांना पाहून ‘मॅडम तुम्ही रात्री इकडे कसे काय ?’ अशी विचारणा केली. त्यावेळी महिलेने कंपनीच्या कामासंदर्भात पोलीस स्टेशनला आल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपी पोमण याने अश्लील बोलून महिलेच्या चरित्र विषयी अपशब्द वापरले.