नाशिक – राज्यातील प्रमुख शहरातील गुन्हेगारी वाढत जात असल्याचे रोज घडणाऱ्या घटनेवरून दिसून येत आहे. गुन्हेगांरावर पोलिसांचा धाक न राहील्याची परिस्थिती सध्या आहे. अशीच एक घटना नाशिक शहरातून समोर आली आहे. येथील एका महिवेवर चाकूने 25 वेळा सपासप वार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पूजा आंबेकर असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळापरून पळ काढला असून तो सध्या फरार आहे. पोलीस आरोपीच्या मागावर असून त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.