वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज (ता.पुरंदर) गावच्या हद्दीतील पवारवाडी फाटा येथे शनिवारी (दि. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी व कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
छाया दिलीप पवार असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलीप गजानन पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. रमेशसिंह सिताराम सिंह असे अटक करण्यात आलेल्याचे कंटेनरचालकाचे नाव आहे. तर याप्रकरणी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या मुलांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत पवार करीत आहेत.