सॅनिटायझरच्या स्फोटात जखमी महिलेचा कोल्हापूरात मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) – घरातील केरकचरा पेटवताना कचर्‍यात असणार्‍या सॅनिटायझर बाटलीचा स्फोट होऊन गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचा रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहेव. सुनीता धोंडिराम काशिद (वय 40, रा. बोरवडे पैकी दत्तनगर, ता. कागल) असे मृत महिलेचे नाव आहे. 

चार दिवसांपूर्वी सुनीता काशिद घराची झाडलोट झाल्यानंतर सर्व कचरा घराच्या बाहेर मोकळ्या जागेत पेटवत होत्या. या कचर्‍यात सॅनिटायझरची बाटलीही होती. कचरा पेटविल्यानंतर अचानक बाटलीचा स्फोट होऊन त्यातील काही सॅनिटायझर काशिद यांच्या अंगावर उडाले. त्यामुळे कपड्यांनी पेट घेतला. 

यामध्ये त्या 80 ते 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे बोरवडे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.