whale vomit । ‘व्हेल’च्या ‘उलटी’मुळे महिलेला मिळाले १ कोटी 92 लाख!

बॅंकॉक ( whale vomit ) – समुद्र किनाऱ्यावरील असणाऱ्या घराशेजारी फिरत असताना सिरीपोर्न निअमरीन ( Siriporn Niamarin ) यांना व्हेल माशाची उलटी सापटली. त्याची किंमत अंदाजे एक लाख 90 हजार पौंड किंवा एक कोटी 92 लाख 21 हजार रुपये इतकी आहे. निखोन सी तम्मरात परगण्यात पाऊस थांवल्यानंतर त्यांना धुतलेला मासांचा गोळा आढळला.

त्यांनी मांसाचा तो गोळा उचलला. त्याला माशासारखा वास येत होता. मात्र त्यातून काही पैसे मिळू शकतील, या आशेने त्यांनी तो मासाचा गोळा घरी नेला. मात्र तिच्या शेजाऱ्यांनी तो गोळा ओळखला. 12 इंच रुंद आणि 24 इंच लांबीचा 151 पाऊंड वजनाची ती व्हेल माशाची ऊलटी होती. त्याला ऍर्म्बेग्रीस असेही म्हणतात. ( whale vomit )

सिरीपोर्न आणि त्याच्या शेजाऱ्यांनी हा ऍर्म्बेग्रीसची सत्यता पडताळण्यासाठी त्याच्याजवळ ज्योत नेली. त्यावेळी हा गोळा वितळू लागला थंड केल्यावर तो पुन्हा कडक झाला. सुवासिक उत्पदनात वापरल्या जाणाऱ्या व्हेलच्या उलटीची खातरजमा करण्यासाठी तज्ज्ञ त्यांच्या घराला लवकरच भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

एवढा मोठा तुकडा मिळाल्याने मला मी नशिबवान असल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे मला पैसा मिळू शकेल. मी तो माझ्या घरात सुरक्षित ठेवला आहे. स्थानिक प्रशासनाला त्याला पाहण्यसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे, असे सिरीपोर्न यांनी सांगितले. ( Siriporn Niamarin whale vomit )

मोठी किंवा धारदार गोष्ट गिळल्यानंतर ती बाहेर काढण्यासाटी गॅस्ट्रोसारख्या प्रक्रिया होते. त्यामुळे व्हेल मासा ऍर्म्बेग्रीस काढतो. ही श्‍लेम्ल त्वचेची तो उलटी करतो. त्यानंतर हा भाग समुद्राच्या लाटांबरोबर किनाऱ्यावर येतो.

व्हेलच्या उलटीला सुरवातीला दूर्गंध येतो. मात्र, सुकल्यानंतर त्यातून सुवास दरवळू लागतो. त्यामुळेच त्याचा वापर सुवासिक उत्पादनांसाठी केला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.