आईच्या मृत्यूने हादरलेल्या डॉक्टर मुलीने सर्जिकल ब्लेडने मांडीची नस कापून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवर उपचार करण्यासाठी ती गेल्या वर्षी लंडनहून भारतात आली होती. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.
मेघा कायल, वय 40 असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर महिलेचे नाव असून त्या लंडनमध्ये न्यूरो आणि मेडिसिन डॉक्टर होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आईवर उपचार करण्यासाठी ती लंडनहून दिल्लीत आल्या होत्या. दिल्लीतील मस्जिद मॉथच्या फेज-1 च्या H-4 मध्ये मेघा यांची आई राहत होती. 27 जानेवारी रोजी त्यांच्या आईचा नैसर्गिक मृत्यू झाला.
आईच्या मृत्यूचा धक्का मेघा यांना सहन झाला नाही.त्या घरात एकट्या राहू लागल्या. मेघा जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्याची आणि नंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मेघा यांच्या उजव्या पायाची मांडीची नस कापून अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.