“बाई जरा दमानं घ्या, का स्वत:चा अपमान करून घेताय?”

मनसेकडून अमृता फडणवीस यांना खोचक सल्ला

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका वक्‍तव्याने राज्यात सध्या वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता त्यांच्या या वादातीत प्रकरणात मनसेनेदेखील उडी घेतली आहे. बाई जरा दमानं घ्या, असा खोचक सल्ला मनसेच्या पुण्यामधील नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना खोचक सल्ला दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अमृता यांनी ठाकरे आडनावावरुन टीका केली होती. त्याच वक्‍तव्यावर रुपाली पाटील यांनी सल्ला दिला आहे.

रुपाली यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अमृता या डोक्‍यावर पडल्याचा खोचक टोला रुपाली यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. वास्तविक पाहता ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्‍यावर पडल्या आहेत, बाई ते ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेंचं होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे? मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता तुम्ही भानवर या, असं रुपाली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच काहीही बिनबुडाचे बोलून का स्वतःचा अपमान करून घेता. लवकर शुद्धीत या आणि गणपती बाप्पाला सद्बुद्धि मागा लवकर देईल बाप्पा सद्बुद्धि, असंही रुपाली या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

दुसऱ्या एका पोस्टमधून रुपाली यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तीमत्व असून त्यांना त्यांची मते आहेत, असं उत्तर फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. यावरुनच रुपाली यांनी अमृता यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला आहे.बाई तुम्ही राजकारणात या, चांगले काम करा. स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्वच्या म्हणजे तुम्ही काहीही बोलणे असे नसते, असे रुपाली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तुम्ही भानावर या कारण महिला म्हणून माजी मिसेस मुख्यमंत्री म्हणून तुमची काळजी आहे, असा टोलाही रुपाली यांनी लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.