सातारा येथील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

सातारा – महागाव, ता. सातारा येथील स्वाइन फ्लू झालेल्या एका महिलेचा आज पुणे येथे उपचार सुरू असताना सकाळी 10. 30 वाजता मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत चिंचणेर वदंन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शशिकला रघुनाथ कदम (वय 44) रा. महागाव, ता. सातारा यांना चार दिवसापूर्वी सर्दी, ताप, खोकला येत होता. त्यांनी गावातीलच एका खाजगी डॉक्‍टरकडे तपासणी करून औषधे घेतली. मात्र काहीच फरक न पडल्याने त्यांनी संगम नगर, (सातारा) येथील एका डॉक्‍टरला दाखवले.

संबंधित डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली असता शशिकला कदम यांना स्वाईन फ्लूची लक्षण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ चांगल्या रुग्णालयात तपासणी करून औषध उपचार करून घेण्याची सूचना केली. त्यानुसार कदम कुटुंबीयांनी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये शशिकला कदम यांना गुरुवारी दुपारी 12 वाजता दाखल केले. मात्र आज सकाळी 10.30 वाजता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शशिकला कदम यांचा स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.