नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलीसह आत्महत्या

भिगवण -अकोले (ता. इंदापूर) येथील 27 वर्षीय महिलेने लहान मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मुलगा होत नसल्याबद्दल दिला जाणारा त्रास आणि लगतच्या नात्यातील महिलेशी पतीचे अनैतिक संबंध यातून ही आत्महत्या केली.

मनीषा महादेव दराडे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तीची तीन वर्ष वयाची मुलगी भाग्यश्री हीस सोबत घेउन विहिरीत आत्महत्या केली. प्रकरणी विवाहितेचे वडील नवनाथ विठोबा खैरे (वय 65, रा. दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून विवाहितेचे पती महादेव चंद्रकांत दराडे आणि रुपाली शरद खैरे (दोघे रा. अकोले, ता. इंदापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषा हिस मुलगा होत नाही. सर्व मुली आहेत. त्यामुळे तिला सोडचिठ्ठी देणार आहे, असे म्हणून पतीने वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तसेच पती महादेव याच्या अनैतिक संबंधामुळे मनीषा कंटाळून गेली होती.

यातून विवाहितेने लहान मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक दडस पाटील हे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.