WIW vs INDW 3rd T20 : भारतीय महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी

प्रोविडेंस (गयाना): भारत आणि विंडिज यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये झालेल्या तिस-या टी २० सामन्यात भारताने विंडिजचा धुव्वा उडवला. तिस-या सामन्यात भारताने विंडिजवर ७ गडी राखून मात केली आणि ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

भारताने गुरूवारी झालेल्या तिस-या सामन्यात विंडिज संघाला २० षटकांत ९ बाद ५९ धावसंख्येवर रोखले. विंडिज संघाची सुरूवात खराब झाली. विंडिजने तीन गडी अवघ्या २६ धावांवर गमावले. या खराब सुरूवातीतून विंडिजचा संघ सावरू शकला नाही. त्यांच्या दोनच फलंदाजाना दुहेरी धावसंख्या गाठता आली. शेल्डन नेशन आणि चिनेले हेनरी हिने प्रत्येकी ११ धावा केल्या. भारतीय गोलंदाजानी प्रभावी गोलंदाजी केली. राधा यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी २ गडी बाद केले. अनुजा पाटील, पूजा वस्त्राकर, हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव ने प्रत्येकी १ गडी बाद केला.

विजयासाठीचे ६० धावांचे लक्ष्य भारताने १६.४ षटकांत ३ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून जेमिमा रोड्रिगेजने ५१ चेंडूत ४ चौकारासह नाबाद ४० धावा करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. तर हरमनप्रीत कौर आणि दीप्ति शर्माने प्रत्येकी ७ धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.