लखनौ : एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तान दरम्यान आजपासून एकमेव कसोटी सामन्यास लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट मैदानावर सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Afghanistan lose three wickets in the first session.
West Indies’ spinners, led by Rahkeem Cornwall, scoop up the home team’s top three to reduce them to 90/3 at lunch.#AFGvWI LIVE ?https://t.co/iR2xwfpVsA pic.twitter.com/Hcp5aht2wB
— ICC (@ICC) November 27, 2019
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीस सुरूवात केली असून उपहारापर्यत ३०.४ षटकात ३ बाद ९० धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. सध्या खेळपट्टीवर रहमत शाह ४ धावांवर खेळत आहे.
अफगाणिस्तानचे सुरूवातीचे तीन फलंदाज इब्राहिम जदरान १७, जावेद अहमदी ३९ आणि इहसानुल्लाह २४ धावांवर बाद झाले आहेत. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत रहकेम काॅर्नवालने २ तर जोमेल वाॅरिकनने १ गडी बाद केला.