शाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश

कोल्हापूरात: भाजपची महाजनादेश यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापुरातील कावळा नाक्यावर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे या रोड शोला उपस्थित आहेत. यात्रा ऐतिहासिक दसरा चौकात आल्यानंतर चौकात असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री पुष्पहार अर्पण करतील अशी शक्यता होती, मात्र ही यात्रा पुतळ्यासमोरुन जाऊनही या रथातील कोणीही खाली उतरून शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे औदार्य दाखवले नाही. त्यामुळे शाहू नगरीमध्ये येऊन सुद्धा शाहूंनाच विसरल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.