हेल्मेट न घालता बाईक चालवणे साराला पडले महागात

सारा अली खानच्या “लव्ह आज कल’चे शुटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. याच सिनेमाच्या शुटिंगदरम्यान तिने एकदा ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले आणि सगळ्या ट्रॅफिकचा बोजवारा उडाला. या शुटिंगचा एक व्हिडीओदेखील साराने इन्स्टाग्रामवर शेअरकेला आणि थोड्याच वेळात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती कार्तिक आर्यनच्या मागे बाईकवर हेल्मेट न घालता बसलेली दिसते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर इंटरनेट युजर्सने व्हिडीओ ट्रॅफिक पोलिसांना टॅग करून साराच्या विरोधात तक्रार नोंडवली. त्यामुळे ती कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सध्या दिल्ली पोलिस या प्रकरणामागील सर्व तथ्य तपासून बघत आहेत. त्यानंतर साराविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर काही कारवाई करण्याचा निर्णय झाला तर मोटर व्हेईकल ऍक्‍ट अंतर्गत दंडाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. सध्या सारा न्यूयॉर्कमध्ये सुटीला गेली आहे. तिथे तिने आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर खूप मजा केली असल्याचे तिच्या पोस्टवरून दिसते आहे. जर दिल्ली पोलिसांकडून तिच्यावर काही कारवाई करायचे असे ठरले, तर तिच्या या सुटीच्या आनंदाचा पार विचका होऊन जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.