कॉंग्रेसशिवाय देशव्यापी आघाडी होऊ शकत नाही – खासदार संजय राऊत

मुंबई, दि. 9 – मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांची आघाडी उभारली जाण्याची गरज आहे. त्यात ममता बॅनर्जी या पुढाकार घेऊ शकतात; पण कॉंग्रेस हाच या आघाडीचा आत्मा असेल. कॉंग्रेसशिवाय देशात अशी आघाडी निर्माण होऊ शकत नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे

ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये मोठी मुसंडी मारली आहे. त्यांनी विरोधी आघाडी तयार करण्याचा निश्‍चित प्रयत्त्न हाती घ्यावा; पण यात कॉंग्रेस असली पाहिजे असे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्ष आज सत्तेत नसला तरी या पक्षाचे अस्तित्व संपूर्ण देशात आहे. आसाम मध्ये या पक्षाला चांगले यश आले आहे. केरळ आणि तामिळनाडूतही या पक्षाला थोडेफार यश आले आहे. पण अजून कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारणे गरजेचे आहे. कॉंग्रेससह निर्माण होणाऱ्या आघाडीचीच देशाला गरज आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येऊन जसे उत्तम सरकार दिले तसाच प्रयोग देश पातळीवर व्हायला हवा असे ते म्हणाले. या बाबत शरद पवार यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे असेही राऊत यांनी यावेळी सांगितले

राज्यात उद्धव ठाकरे यांना तीन पक्षांनी मिळून नेता केले. त्यांनी उत्तम काम चालवलं आहे. शिवसेनेने राज्यात कोविडच्या संबंधात जे काम केले ते अन्य राज्यांत अन्य पक्षांना जमलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या राज्यांत जशा चिता पेटल्या आहेत तशा चिता महाराष्ट्रात पेटलेल्या दिसत नाही असे ते म्हणाले. शिवसेनेने पक्ष पातळीवर समांतर काम केले त्यामुळे राज्य सरकारचाही भार कमी झाला असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.