सुरत – आंतरराष्ट्रीय खेळाडू वैष्णवी आडकर व ऋतुजा भोसले यांच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने महिलांच्या टेनिस स्पर्धेत शानदार प्रारंभ केला. त्यांनी दिल्लीचा 2-0 असा दणदणीत पराभव केला.
#राष्ट्रीयक्रीडास्पर्धा
आंतरराष्ट्रीय खेळाडू वैष्णवी आडकर व ऋतुजा भोसले यांच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने महिलांच्या टेनिस स्पर्धेत विजयाचा शानदार प्रारंभ केला. त्यांनी दिल्लीचा २-० असा दणदणीत पराभव केला. pic.twitter.com/4wION9lMjV— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 29, 2022
वैष्णवी हिने महाराष्ट्राला 1-0 अशी आघाडी देताना काव्या खिरवार हिचा 6-2, 6-2 असा पराभव केला. या सामन्यात तिने दोन्ही गेम्स मध्ये प्रत्येकी दोन वेळा सर्व्हिस ब्रेक करताना परतीचे खणखणीत फटके आणि बिनतोड सर्व्हिस चा सुरेख खेळ केला. तसेच तिने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.
एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात ऋतुजा हिने कशिश भाटिया हिच्यावर 6-0, 6-1 असा सफाईदार विजय नोंदविला. या सामन्यात ऋतुजा हिने केलेल्या आक्रमक खेळापुढे कशिश हिला बचाव करता आला नाही.
दुसऱ्या सेटमध्ये ऋतुजा हिला पाचव्या गेम मध्ये स्वतःची सर्व्हिस राखता आली नाही. त्यामुळे तिला ही गेम गमवावी लागली. मात्र नंतर एका सर्व्हिस ब्रेकसह सलग दोन गेम्स घेत तिने विजयश्री संपादन केली. या सामन्यात कशिश हिला एकाही गेम मध्ये स्वतःची सर्व्हिस राखता आली नाही.