प्रसूती कळा सुरू झाल्याने बस थेट कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात

कुरकुंभ- पुण्याकडून उस्मानाबाद कडे जात असताना गुरुवार(दि.30) पहाटे साडेपाचच्या सुमारस एका गर्भवती महिलेला खासगी बसमध्येच प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने बस थेट कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आली. येथे महिलेची प्रसूती करण्यात आली असून बाळ-बाळंतीन सुखरुप असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

निलोफर शफीक मोगल (रा.कुर्ला) या पती शफीक यांच्यासह पुण्यातून उस्मानाबादकडे खासगी बसने प्रवास करीत होत्या. पाटस टोल प्लाझाच्या पुढे बस आल्यावर त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्या. त्यातच पहाटेची वेळ असल्याने डॉक्‍टर असतील की नाही ही भीती कुटुंब होती. अखेर बस थेट कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आली. येथे वैद्यकीय अधिकारी राजेश पाखरे यांनी आरोग्य सेविका पुष्पा गायकवाड यांच्या मदतीने संबंधित प्रसूती केली. बाळ व बाळाची आई सुखरुप असल्याने नातेवाईकांनी बसचालकासह प्रवासी, डॉक्‍टर व त्यांच्या सहकार्याचे आभार मानले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.