विकासाचा अनुशेष भरून काढल्याने जनता पाठीशी

-ना. राम शिंदे : पोतेवाडी येथे 76 लाख 98 हजारांच्या निधीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
-तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
-सत्तेचा वापर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी 

जामखेड – लोकांची कामे अडवून ठेवण्याऐवजी अडलेल्यांची कामे प्रामाणिक करीत असून माझे व तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेशी विश्‍वासाचे एक नाते निर्माण झाले आहे, याच विश्‍वासाच्या नात्यामुळे मंत्रिपदापर्यंत पोहचलो आहे. या सत्तेचा वापर सामान्यांना न्याय देण्यासाठीच करत असून तालुक्‍यात विविध विकासकामे केली आहेत. अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरुन काढलेला आहे. यापुढेही तालुक्‍यातील सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची माझी जबाबदारी असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी पोतेवाडीत रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

जामखेड तालुक्‍यातील पोतेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 71 लाख 98 हजार रुपये निधीचा डांबरीकरण रस्ता व 25/15 योजनेंतर्गत 5 लाख किमतीच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड,जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरने, अनिल लोखंडे, पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरुमकर, उपसभापती सुर्यकांत मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, विलास मोरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ऍड. प्रविण सानप, जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक, ज्योतीक्रांतीचे मल्टीस्टेटचे चेअरमन आजिनाथ हजारे, नान्नजचे सरपंच डॉ.सर्जेराव मोहोळकर, संजय सुर्वे, शिवकुमार गुळवे, भारत उगले, बोर्ला सरपंच कृष्णाराजे चव्हाण, सावरगांवचे सरपंच काकासाहेब चव्हाण, आरणगांवचे सरपंच लहु शिंदे, संतोष मोहोळकर, खांडवी सरपंच डॉ. गणेश जगताप, चोंडीचे उपसरपंच पांडुरंग उबाळे,सातेफळचे सरपंच गणेश लटके, सोनेगांव सरपंच चत्रभुज बोलभट, सुनिल यादव, उध्द्वव हुलगुंडे, पोतेवाडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, तालुक्‍यात पक्षीय राजकारण न करता विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन मागील 70 वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढल्याने जनता आपल्याच सोबत आहे. या अनुषंगाने या पुढील काळात रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत प्रश्‍नासह सर्वांगीण विकासासाठी कटिबंध राहणार आहे. विरोधकांना प्रचारासाठी आल्यावर एकच प्रश्‍न विचारा आमच्या कर्जत -जामखेड तालुक्‍यासाठी तुम्ही काय केले आहे? काहीजण भूलभुलैय्या करून मते देण्याचे आवाहन करतील, मात्र त्यांना वरील प्रश्‍न जरूर विचारा. त्यांच्याजवळ या प्रश्‍नाचे उत्तर नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)