मते कमी मिळूनही…

महिलांमध्ये सर्वाधिक मते मिळवून खासदार होण्याचा विक्रम भारतीय जनता पक्षाच्या प्रीतम मुंडे यांच्या नावावर नोंद आहे. गोपीनाथरावांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी 9.22 लाख मते मिळवली होती. मात्र वाचकहो, संसद सदनात खासदार बनून गेलेल्या महिलांमध्ये सर्वांत कमी मते मिळवून गेलेली महिला कोण हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना, त्यांचे नाव आहे श्रीमती निर्मला देवी.

भारतीय जनता पक्षाच्या निर्मलाताईंनी 1998 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेशातील प्रागपूर लोकसभा मतदारसंघातून लढवलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना केवळ 22651 एवढीच मते मिळाली होती. विशेष म्हणजे, त्यांना मिळालेली ही मते एकूण मतांच्या 65.59 टक्‍के होती.

अशाच प्रकारे 1977 मध्ये लडाख लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या पार्वतीदेवी यांना केवळ 23130 मते मिळाली. पण एकूण मतांपैकी त्यांना मिळालेल्या मतांची टक्‍केवारी 53.32 इतकी होती. त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि खासदार बनल्या. 1962 मध्ये उत्तर प्रदेशातील बांदा लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या सावित्री निगम यांना 45,919 इतकी मते मिळाली. त्यांची मतांची टक्‍केवारी 36.62 टक्‍के होती. याखेरीज

1952 : मांडी लोकसभा मतदारसंघ : हिमाचल प्रदेश : अमृत कौर (कॉंग्रेस) : 47,152 : 26.89 टक्‍के
1952 : नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ : सुचेता कृपलानी (केएमपीपी) 47735 : 46.72 टक्‍के
1952 : आसाम लोकसभा मतदारसंघ : बोनली खोंगमेन (कॉंग्रेस) : 59326 : 54.10 टक्‍के
1952 : पाटणा पूर्व लोकसभा मतदारसंघ : बिहार : तारकेश्‍वरी देवी (कॉंग्रेस) : 62238 : 46.90 टक्‍के

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.