एचसीएलचा चमकदार ताळेबंद; विप्रोला टाकले मागे 

बेंगळुरू:  विप्रोला मागे टाकत एचसीएल टेक्‍नोलॉजीस सॉफ्टवेअर क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी ठरली आहे. एचसीएलने जून तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीचा नफा गेल्या वर्षाच्या तुलनेत 10.7 टक्‍क्‍यांनी वाढ होत 2,403 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे डॉलर उत्पन्न 0.8 टक्‍क्‍यांनी वाढत 2.05 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे, तर विप्रोचे हेच उत्पन्न 1.7 टक्‍क्‍यांनी घटत 2.03 अब्ज डॉलर्स होते. वार्षीक पातळीवर कंपनीचे एकूण उत्पन्न 14.2 टक्‍क्‍यानी वाढत 13,878 कोटी रुपयांवर पोहोचले.
गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात विप्रोचे एकूण उत्पन्न 8.06 अब्ज डॉलर्स होते, तर एचसीएल टेक्‍नोलॉजीसचे उत्पन्न 220 दशलक्ष डॉलर्सने कमी म्हणजेच 7.84 अब्ज डॉलर्स होते. मात्र जून तिमाहीत डॉलर उत्पन्नात वाढ झाल्याने विप्रोला मागे टाकण्यास यश आले. एचसीएल टेकचे सीईओ विजयकुमार यांनी कंपनीने आपल्या इतिहासात प्रथमच उच्चांकी नफा कमविल्याचे म्हटले. गेल्या काही वर्षात विप्रोच्या तुलनेत एचसीएलने आक्रमक रणनीतीचा अवलंब केला आहे. यामध्ये काही कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. कॉग्निझन्ट टेक्‍नोलॉजी ही अमेरिकेत सूचीबद्ध असल्याने तिचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)