‘त्या’ प्रश्‍नांबद्दल डॉक्‍टरांसोबत – खासदार सुळे

बारामती – राष्ट्रीय मेडिकल आयोग (एनएमसी) बिलामुळे निर्माण होऊ घातलेल्या प्रश्‍नांबद्दल डॉक्‍टरांसोबत राहणार असल्याचे आश्‍वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

आय.एम.ए. बारामती शाखेने आयोजित केलेली महिलांची राज्यस्तरीय परिषद बारामती येथे नुकतीच पार पडली. या परिषदेस राज्याच्या विविध भागातून सुमारे 350 प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेच्या एका सत्रात खासदार सुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात महिलांचे विविध प्रश्‍न तसेच त्यांची एकाचवेळी अनेक भूमिका बजावण्याची हातोटी यावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी डॉक्‍टरांसमोर असलेल्या विविध प्रश्‍नांचा उहापोह करीत वरील आश्‍वासन दिले.

दरम्यान, या परिषदेचे घोषवाक्‍य वेलनेस ऑल वूमन असे होते. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत महिलांच्या सर्वांगीण आरोग्यविषयक विविध व्याख्यानांचे आयोजन केले होते. या परिषदेचे उद्‌घाटन महाराष्ट्र आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. होझी कपाडिया यांच्या हस्ते व राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, खजिनदार डॉ. सुहास पिंगळे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्या उपस्थितीमध्ये झाले. या परिषदेत विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्‍टरांनी मार्गदर्शन केल. या परिषदेचे आयोजन आय. एम. ए. महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, बारामतीचे अध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार, सचिव डॉ. सोमनाथ राऊत, खजिनदार डॉ. संतोष घालमे, माजी अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, परिषदेच्या अध्यक्षा डॉ. विभावरी साळुंके, सचिव डॉ. माधुरी राऊत, सहसचिव डॉ. सौरभ मुथा यांनी केले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×