वाढदिवस मायदेशी साजरा करण्याची इच्छा : ऋषी कपूर

न्यूयॉर्क – बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, येत्या 4 डिसेंबरला ऋषी कपूर यांचा 67वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस ऋषी कपूर यांना मायदेशी आपल्या घरच्यांबरोबर आणि मित्रांसोबत साजरा करायची इच्छा आहे. परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ऋषी कपूर हा निर्णय घेणार आहे.

सध्या न्यूयॉर्क मध्ये कपूरयांच्या बरोबर त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर हे देखील आहेत. स्वत: ऋषी कपूर यांनी मागील काही महिन्यात ’29 सप्टेंबर’ रोजी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. यानंतर अनेक बॉलिवूड स्टार देखील त्यांना भेटायला न्यूयॉर्कला गेले आणि अनेकजण सातत्याने त्यांच्या तब्येतीची देखील चौकशी करत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.