मुंबई – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीही शेअरचे बायबॅक करणार असून कंपनीचे संचालक मंडळ 13 ऑक्टोबर रोजी निर्णय जाहीर करणार आहे. यासंदर्भातील निर्णय संचालक मंडळ घेणार असल्याचे कंपनीने शेअरबाजारांना कळविले आहे.
मात्र, इतर तपशील दिला नाही. संचालक मंडळाने घेतलेला निर्णय शेअरबाजारांना कळविला जाणार आहे. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचे भाव 7.34 टक्क्यांनी वाढून 360 रुपयांवर गेले.