नवी दिल्ली – विप्रोचे संस्थापक अझिम प्रेमजी 30 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. प्रेमजी यांनी 53 वर्षे कंपनीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली व कंपनीला नव्या शिखरावर पोहोचवले. प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जागा त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी घेतील. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दाली नीमुचवाला हे 31 जुलैपासून विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहतील.
निवृत्तीनंतर अझिम प्रेमजी 31 जुलैपासून पाच वर्षांसाठी कंपनीमध्ये विगर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. त्याचबरोबर कंपनीने अझीम प्रेमजी यांना संस्थापक-अध्यक्ष म्हणून सन्मानित केले आहे.तंत्रज्ञान क्षेत्राच्या युगाचे अझिम प्रेमजी हे अग्रणी आहेत.