विप्रो कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार

पुणे – जिल्हा परिषद आणि विप्रोच्या वतीने हिंजवडीतील कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने सुरू असलेले रुग्णालय पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे. सध्या या रुग्णालयात 288 रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, 439 बेडची या रुग्णालयाची क्षमता आहे.

पुढील काही दिवसांमध्ये नवीन कर्मचारी रुजू झाल्यानंतर रुग्णालयामध्ये सर्व बेडवर रुग्णांवर उपचार सुरू केले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी दिली. पहिल्या लाटेत अनेक रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतले.

रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजनची व्यवस्था उपलब्ध असून, दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्याठिकाणी आवश्‍यक मनुष्यबळासाठी कंत्राटी स्वरूपात भरती केली जाणार आहे.

या रुग्णालयात सध्या एमडी डॉक्‍टर पाच, एमबीबीएस-12, बीएएमएस-63, नर्स 81 आहेत. आणखी पन्नासपेक्षा अधिक नर्सची भरती केली जाणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.