पुणे – देशभरात थंडीला पडायला सुरुवात झाली असून, मासेमारी घटली आहे. परिणाम मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत खोल समुद्रातून येणाऱ्या मासळीच्या भावात 10 ते 20 टक्के दरवाढ झाली. उर्वरित प्रकारच्या मासळीच्या भाव स्थिर आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे अंडी, चिकन आणि मटणाचे भाव स्थिर असलायची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्री मासळीची सुमारे 15ते 16 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो तर नदीच्या मासळीची 1 ते 1.5 टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : 1400, मोठे 1300, मध्यम : 900, लहान 750, भिला : 500-550, हलवा : 440-480, सुरमई : 440, रावस : लहान 550 मोठा : 750, घोळ : 500, भिंग : 400, करली : 280, करंदी : सोललेली 480, पाला : लहान 700, मोठे : 1200-1400, वाम : 600-800, ओले बोंबील : 100-1600, कोळंबी ः लहान 280, मध्यम 360-480, मोठे 550, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1200-1300, मोरी : 240-320, मांदेली : 100-120, राणीमासा : 200, खेकडे : 000, चिंबोऱ्या : 440-480.
खाडीची मासळी : सौंदाळे : 240-320, खापी : 240, नगली : लहान 360, मोठी 700, तांबोशी : 400, पालू : 280, लेपा : लहान 160 मोठे 240, शेवटे : 240, बांगडा : लहान 200 , मोठे 300, पेडवी : 800-100, बेळुंजी : 160, तिसऱ्या : 280, खुबे : 140, तारली : 180.
नदीची मासळी : रहू :140, कतला : 160-180, मरळ : 440-480,शिवडा : 280, खवली : 240-280,, आम्ळी :120-140, खेकडे : 200 वाम :500-500
चिकन : चिकन : 200, लेगपीस : 240 जिवंत कोंबडी : 160, बोनलेस : 300.
अंडी : गावरान : शेकडा : 830 डझन : 108 प्रति नग : 9, इंग्लिश : शेकडा : 480डझन : 72 प्रतिनग : 6.