#Winterhealthtips : ‘निलगिरी’ तेलाचे औषधी फायदे

इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी ‘निलगिरीचे तेल’ नक्की वापरा.


सर्दीमुळे किंवा नाक चोंदल्याने कान दुखत असल्यास वाफ घेणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाण्यात 4-5 निलगिरीच्या तेलाचे थेंब टाका. डोकं जाड चादरीने किंवा टॉवेलने झाका. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना नाक मोकळे होईल. परिणामी कानदुखीचा त्रासही कमी होतो

  • जर तुम्ही संधिवातानी त्रस्त असाल तर त्यावर निलगिरीच्या तेल उत्तम औषध म्हणून काम करते. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळल्याने संधिवाद कमी होतो.
  • भाजलेल्या जागेवर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्यास जखम लवकर भरून येते.
  • श्वसननलिकेचा दाह आणि तुम्ही कित्येक दिवसा पासून दम्याचा त्रास सहन करत असाल तर यावर निलगिरीचे तेल उत्तम उपाय आहे.
  • निलगिरीच्या मुळामध्ये रेचक आणि निलगिरीच्या खोडाच्यासालींमध्ये टॅनिन असते यामुळे हे निलगिरीचे तेल नाकाच्या तक्रारीमध्ये उपयोगी असतो.
  • जुन्यात जुने कातडीचे रोगांवरही निलगिरीचे तेल उपयुक्त सिद्ध होते.

Leave A Reply

Your email address will not be published.