पुणे – ऐन हिवाळ्यात गायब झालेल्या थंडीने मागील 24 तासांत राज्याला “हुडहुडी’ भरवली आहे. 14 ते 17 अंशावर असलेले किमान तापमान 10 ते 11 अंशांपर्यंत घसरल्यामुळे मध्य महाराष्ट्र गारठला आहे.
बुधवारी नाशिक येथे सर्वांत कमी 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, महाबळेश्वरपेक्षा पुणे, नाशिक, औरंगाबाद, चंद्रपूर आणि सातारा शहर गारठले आहे. या शहरांतील किमान तापमान 11 अंशाखाली आली होते.
पुणे 10 अंशांवर
मागील पंधरवड्यात शहरातील किमान तापमान 17 अंशावर होते. त्यामुळे थंडी गायब होती. मात्र, गेल्या 24 तासांत अचानक शहरातीच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, थेट 10.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. 5 जानेवारीपर्यंत शहरात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे.