वाघळवाडी – सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर अनेक वर्षांची रेकॉर्ड मोडात नवीन अतिवृष्टीने नवीन रेकॉर्ड रचले आहेत. तर आता दाट धुक्याची झालर परिसरात पसरली असल्याने ही गुलाबी थंडीचे चाहूल असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.
सोमेश्वरनगर परिसरात महापूर त्यानंतर अतिवृष्टी यामुळे शेत पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील आठवड्यामध्ये सोमेश्वरवासीयांनी दिवाळीमध्ये पावसाळ्याचा अनुभव घेतला आणि आता मोठ्या प्रमाणावर धुके पडले आहे. शनिवारी (दि. 9) पहाटे सोमेश्वरनगर परिसर दाट धुक्यात हरवले होते. सगळीकडे दाट धुके पडल्याने रस्ते, शेती, घर, शाळा, कालवा, नदी सोडून द्या समोर उभी असलेली व्यक्तीही धुक्यामुळे दिसत नव्हाती. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना वाहनलकांना वाहनाच्या हेडलाईच्या प्रकाशात रस्ता शोधण्याची वेळ आली होती.
धुके शेतीस धोकादायक
पहाटे धुके पडल्यानंतर हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक कालावधीसाठी राहते आणि त्यातच दव पडल्यास पिकांचे भाग ओले राहतात आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. धुके आणि दव यामुळे शेत पिकास मोठ्या प्रमाणावर फटका बसूतो त्यामुळे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिलेच अतिवृष्टीने ने तर आता धुक्याने उरलेसुरलेले पिकही हातचे जाणार असल्याने शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले आहे.