विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा होणार सन्मान

नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या धाडसाचे कौतुक सगळ्या देशाने केले होते. आता वायुदलाकडून त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वाड्रन 51 चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा विशेष सन्मान करणार आहेत. पुलवामा या ठिकाणी 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बरोबर तेरा दिवसांनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईक दरम्यान महत्त्वाची कामगिरी बजावली ती अभिनंदन वर्धमान यांनी. त्यांनी पाकिस्तानचे हवाई हल्ला करणारे विमान खाली पाडले. ही कामगिरी बजावत असताना अभिनंदन यांचे विमानही अपघातग्रस्त झाले.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना कैद केले. अभिनंदन वर्धमान दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतल्यामुळे एक मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची सुटका केली. 27 फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला. परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. आता त्यांच्या स्क्वार्डनचा वायुदलातर्फे विशेष सन्मान केला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.