#व्हिडीओ : अभिनंदन मिशी स्टाईलचा तरुणांमध्ये ट्रेंड

कोल्हापूर – बहादूर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानमध्ये ६० तास घालवल्या नंतर ते आपल्या देशात परतले. भारतात परत आल्याबद्दल सोशल मीडियावर त्यांचे जोरदार स्वागत झाले आहे. शिवाय #WelcomeHomeAbhinandan ट्रेंड सुद्धा सुरू झाला. त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा ट्रेंड सुरू झाला आहे तो म्हणजे अभिनंदन यांच्या मिशीचा. त्यांच्या मिशीचे अनेक जण चाहते झाले आहेत. कोल्हापूरातील तर एका सलूनमध्ये चक्क अभिनंदन स्टाइल मिशी बनवायचे असेल तर एकदम मोफत असा उपक्रमाच सुरू करण्यात आला आहे.

मिश्या असाव्यात तर अभिनंदन यांच्यासारख्या नाहीतर मिशाच नसाव्यात असे म्हणत अनेक तरुण त्यांच्यासारख्या मिशा बनवून घेण्यासाठी या सलूनमध्ये गर्दी करत आहेत. कोल्हापूरातील राजारामपुरीमध्ये हेअर अफेयर (hair affair) नावाचं हे सलून आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अभिनंदन यांच्या मिशीची अशा प्रकारे चर्चा होत आहे की, अभिनंदन यांच्या मिशीचा आता भारतात ट्रेंडच बनत आहे. अनेक जण तशा पोस्ट सुद्धा अपलोड करत आहेत. कोल्हापूरातील तरुणही यात मागे राहिले नाही.

विशेष म्हणजे सलून मालक यांनी अभिनंदन स्टाईल मिशी बनवली तर हेअर स्टाईल सुद्धा फ्री करून देणार असल्याचा बोर्डच दुकानाबाहेर लावला आहे. त्यामुळे सकाळपासूनच यांच्या हेअर अफेयर या सलुनमध्ये तरुण अभिनंदन स्टाईल मिशी बनवून घ्यायला गर्दी करत आहेत.

ज्या बहादूरी आणि धाडसाने विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्याचवेळी भारतातील जनतेला हे समजलं होतं की हा पायलट खूपच हुशार आहे. कठीण काळातही ज्याप्रकारे अभिनंदन यांनी विनम्रतेने त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली ती खरच खूप काही शिकवून जाणारीयेत. त्यामुळेच ते संपूर्ण भारतीयांच्या मनात घर करून गेले. प्रत्येक भारतीयाला त्यांच्याविषयी अभिमान वाटू लागला आहे की त्यांच्यासारखा वीर सैनिक आपल्या देशाला लाभला. त्यामुळेच लोक आता त्यांच्या स्टाईलची कॉपी करायला लागले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)