#WIvENG : तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा विजय; वेस्टइंडिजने 2-1 ने मालिका जिंकली

वेस्ट इंडिजचा 2-1 ने मालिका विजय; केमार रोच मालिकावीर

सेंट लूसिया – मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत जेम्स एंडरसन आणि मोईन अली यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने वेस्टइंडिजचा 232 धावांनी पराभव केला आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने जरी विजय मिळवला असला तरी वेस्ट इंडिजने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विजय मिळवित मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यातील पराभवामुळे वेस्ट इंडिजने ही मालिका 2-1 ने आपल्या नावे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, इंग्लंडने आपला दुसरा डाव 5 बाद 361 वर घोषित केला होता. त्यामुळे पहिल्या डावातील 123 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 361 धावा मिळून इंग्लंडने वेस्टइंडिजसमोर विजयासाठी 485 धावांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून जो रूटने शतकी खेळी करत सर्वाधिक 122 धावा केल्या तर जोसेफ लियम डेनलीने 69, जोस बटलरने 56 आणि बेन स्टोक्सने 48 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शैनन गेब्रिएल 2 विकेट घेतल्या.

विजयासाठी 485 धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचा संघ इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर 252 धावांवर आटोपला. वेस्टइंडिजचा फलंदाज डॅरेन ब्रावो आणि जाॅन कॅपबेल शून्यावर तंबूत परतले. तर राॅसटन चेंजने नाबाद 102 धावांची खेळी केली पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. इंग्लंडकडून जेम्स एंडरसन आणि मोईन अलीने प्रत्येकी 3 विकेटस घेतल्या. तर बेन स्टोक्सने 2 आणि मार्क वुडने 1 विकेट घेतली.

मार्क वुड हा सामनावीर ठरला तर मालिकावीराचा किताब वेस्टइंडिजच्या केमार रोचने पटकाविला.

https://twitter.com/windiescricket/status/1095491867867795456

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)