विम्बल्डन टेनिस स्पर्धा : स्ट्रायकोवा व हॅलेप उपांत्य फेरीत

विम्बल्डन – बार्बरा स्ट्रायकोवा व सिमोना हॅलेप यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. गतविजेत्या सेरेना विल्यम्स हिने एकेरीबरोबरच मिश्रदुहेरीतही अपराजित्व राखले.

चेक प्रजासत्ताकची खेळाडू स्ट्रायकोवाने स्थानिक खेळाडू योहाना कोन्ता हिचे आव्हान 7-6 (7-5), 6-1 असे संपविले. तिने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. तसेच तिने व्हॉलीजचा कल्पकतेने उपयोग केला. योहानाने पहिल्या सेटमध्ये चिवट खेळ केला. तथापि दुसऱ्या सेटमध्ये तिला सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा स्ट्रायकोवाला मिळाला.

सातव्या मानांकित हॅलेपने चीनची खेळाडू शुई झेंग हिची विजयी घोडदौड 7-6 (7-4), 6-1 अशी रोखली. पहिल्या सेटमध्ये झेंगने टायब्रेकरपर्यंत चांगली लढत दिली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये तिने सर्व्हिसच्या खूप चुका केल्या. तसेच ती परतीच्या फटक्‍यांवर नियंत्रण ठेवू शकली नाही. हॅलेपने या सेटमध्ये बॅकहॅंड फटक्‍यांचा उपयोग केला. तिने सर्व्हिसब्रेकही मिळविला व विजयश्री मिळविली. तिची कॅरोलिना मुचोवाशी लढत होणार आहे. मुचोवाने आश्‍चर्यजनक विजयाची परंपरा राखताना आठव्या मानांकित एलिना स्वितोलिना हिला पराभवाचा धक्का दिला. तिने ही लढत 7-5, 6-4 अशी जिंकली व उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिने व्हॉलीजचा कल्पकतेने खेळ केला तसेच तिने अचूक सर्व्हिस केल्या.

सेरेनाने अमेरिकेच्याच ऍलिसन रिस्की हिची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. चुरशीच्या सामन्यात तिने 6-4, 4-6, 6-3 असा विजय मिळविला. उपांत्य फेरीत तिची स्ट्रायकोवाशी गाठ पडणार आहे. मिश्रदुहेरीत सेरेना व मरे विजयी सेरेनाने अँडी मरे याच्या साथीत मिश्रदुहेरीत विजय मिळविला. या जोडीने फॅब्रिस मार्टिन (फ्रान्स) व रॅक्वील ऍटावो (अमेरिका) यांचा 7-5, 6-3 असा पराभव केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.