#CWC2019 : विल्यम्सनने टाकले जयवर्धनेला मागे

लंडन – ख्रिस व्होक्‍स आणि लियाम प्लंकेट यांच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडची तगडी फलंदाजी ढेपाळल्याने न्यूझीलंडला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 241 धावांचीच मजल मारता आली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 2019 विश्वचषक स्पर्धेत आपला फॉर्म कायम राखत विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या कर्णधारांच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे.

2007 साली श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनने 548 धावा केल्या होत्या. विल्यमसनने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आता आपल्या नावे जमा केला आहे. याचसोबत 2019 विश्वचषक स्पर्धेतही सर्व संघाच्या कर्णधारांच्या तुलनेत विल्यमसनची कामगिरी उजवी ठरली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.