Maharashtra Politics | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडीने फडणवीसांची भेट घेऊन दिल्लीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली आहे.
दिल्लीत केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद दिले होते. आता महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेतेपद मिळेल का याची चर्चा सुरू झाली आहे. यातच राहुल नार्वेकरांनी आपण विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर योग्य निर्णय घेणार असल्याचं म्हटले आहे.
ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात तत्काळ अवगत करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. पण ही माहिती अद्याप मिळाली नसल्याने रविवारी भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन पुन्हा ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली. Maharashtra Politics |
भास्कर जाधव काय म्हणाले ?
दिल्लीच्या ७० सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे ६७ आणि भाजपचे केवळ ३ आमदार निवडून आले होते. तरीही अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देऊन लोकशाहीचा सन्मान केला होता. तसाच सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात करतील, असे वाटते. आमच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते निवडीसाठी १० टक्के आमदार संख्येची तरतूद नाही. त्यामुळेच आम्ही यासंदर्भात माहिती मागवली आहे, असे भास्कर जाधव यांनी सांगितले आहे. Maharashtra Politics |
किमान 29 आमदारांचे संख्याबळ आवश्यक
संख्याबळ असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, मविआतील एकाही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे नियम व कायद्यातील तरतुदींची खात्री करून घेण्यासाठी जाधव यांनी हे पत्र सचिवांना दिले होते.
महाविकास आघाडीत किती आमदार ?
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 15 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या केवळ 10 आमदारांना यश मिळाले आहे. तर समाजवादीचे 2, शेकापचे 1 व अपक्ष 1 असे मिळून हे संख्याबळ 49 होते. यामुळे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं 29 जागांचं संख्याबळही गाठता आलेले नाही.
हेही वाचा: