विधानसभासाठी ‘मायावती पॅटर्न’ वापरणार – प्रकाश आंबेडकर

मुंबई – लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरलेल्या वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणूकीसाठी रणनीती आखली असून काही दिवसांपूर्वी एकत्रितपणे लढविण्याचा मुद्यावर पुण्यातील बैठकीत चर्चा केली होती. यातच एक वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखती प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभासाठी मायावती पॅटर्न वापरणार असल्याचा दावा केला आहे.

वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखती प्रकाश आंबेडकर म्हटले,’  महाराष्ट्रात ब्राह्मण वंचित असतील तर त्यांना आमच्या पक्षात स्थान देऊ आणि निवडणुकीला तिकीटही देऊ , जे वंजित आहेत आणि ज्यांनी आधीचा आपला पक्ष सोडण्याचं कारण दिलं आहे त्या सर्वांना आमच्या आमच्या पक्षाची दारं खुली आहेत. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकमध्ये वंचित बहुजन आघाडी ही प्रमुख विरोधाची भूमिका पार पाडेल. असंही ते म्हटले. तत्पूर्वी, पुण्यातील बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.