अक्षयच्या बहुचर्चित ‘रावडी राठोड’चा येणार सिक्‍वल?

चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांनी 2012 मध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत “रावडी राठोड’ हा सुपरहिट चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट “विक्रमारकुडु’ या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. या हिंदी रिमेक चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा याने केले होते, जे मसाला चित्रपट साकारण्यात माहीर आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

“रावडी राठोड’ला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाच्या सीक्‍वलची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही चाहत्यांनी तर या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर तयार केला होता. विशेष म्हणजे, या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

जर “रावडी राठोड’चा सिक्वेल झाला तर तो अक्षय कुमारबरोबर बनवेल, असे सांगून चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवाने हे प्रकरण तापवले. ही घोषणा लवकरच ऐकली जाईल असे वाटले, पण आतापर्यंत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, अक्षय आणि भन्साळी यांच्यात चांगली ट्युनिंग आहे. “रावडी राठोड’नंतर दोघांनी “गब्बर इज बॅक’मध्ये एकत्र काम केले. भन्साळी यांच्या “पद्मावत’ चित्रपटासाठी अक्षयने आपला “पॅडमॅन’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली होती. आता चाहत्यांना पुन्हा एकदा ऍक्‍शन हिरो अक्षय कुमारला “रावडी’च्या भूमिकेत पाहण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.