Pune News : बाणेर-बालेवाडी परिसरातील वारंवार वीज खंडितीचा प्रश्न केवळ तांत्रिक बिघाडापुरता मर्यादित नसून, रखडलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे हा भाग गंभीर वीज संकटाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे समोर आले आहे. आयटी हब म्हणून झपाट्याने वाढणाऱ्या या परिसरात सध्याची वीज क्षमता अपुरी पडत असताना, नवीन सबस्टेशन उभारणीला झालेल्या विलंबामुळे नागरिकांना पुढील ५ ते ७ वर्षे अनियमित वीजपुरवठ्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Sai Tamhankar : “काही जणांना झोंबलं…”; प्राजक्ता माळीच्या ‘कान्स’ लुकवर सई ताम्हणकरची प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वीज खंडितीमुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी महावितरणविरोधात आंदोलनही केले होते. त्यानंतर नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बालेवाडी सर्व्हे नंबर ४ येथील प्रस्तावित सबस्टेशनसाठी राखीव जागेची पाहणी करण्यात आली. सध्या बाणेर-बालेवाडी भागाला एनसीएल ईएचव्ही केंद्रातून सुमारे १५० मेगावॅट, तर सुस-म्हाळुंगे परिसराला हिंजवडी ईएचव्ही केंद्रातून ७५ मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. मात्र वाढत्या नागरीकरण आणि आयटी कंपन्यांच्या विस्तारामुळे ही क्षमता अपुरी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सबस्टेशनसाठीची गायरान जागा २०१९-२०२० मध्येच महापारेषण आणि महावितरणला सुचवण्यात आली होती. मात्र प्रशासकीय विलंब, निधीअभावी नियोजनातील ढिसाळपणा आणि पाठपुराव्याच्या अभावामुळे प्रकल्प रखडला. प्रकल्पासाठी ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित या प्रकल्पासाठी ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून २०२७-२८ पर्यंत निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे लागू शकतात. दरम्यान, प्रस्तावित जागेवर अजूनही डेब्रीस आणि राडारोड्याचे ढिगारे असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सबस्टेशन पूर्ण झाल्यास अतिरिक्त १५० मेगावॅट वीजपुरवठा उपलब्ध होणार असला, तरी तोपर्यंत बाणेर-बालेवाडीकरांना अंधार, खंडित पुरवठा आणि त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. ‘नवीन सबस्टेशन उभारण्यासाठीची मोकळी गायरान जागा २०१९-२०२० मध्येच महापारेषण आणि महावितरणला सुचवली होती. मात्र प्रशासनाचा विलंब आणि वरिष्ठ लोक प्रतिनिधी आणि स्थानिक आमदारांच्या उदासीनतेमुळे प्रकल्प रखडला आहे.’ – अमोल बालवडकर (स्थानिक नगरसेवक) हेही वाचा: Walking: मधुमेहींसाठी चालणे ठरू शकते रामबाण! जेवणानंतर ‘इतका’ वेळ चाललात तर साखर राहील नियंत्रणात