रवींद्र कदम
अनधिकृत कनेक्शनचा नियमित
पाणीपट्टीधारकांवर भार
महापालिका हद्दीत अंदाजे 60 नळ कनेक्शन असून, अनाधिकृत नळ कनेक्शनचा बोजा नियमित पाणी पट्टी धारकावर पडणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 1 हजार 500 हून त्यांना 3 हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे. त्यामुळे अनाधिकृत नळ धारकांवर महापालिकेचया पाणी पुरवठा विभाने कारवाई करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
नगर – महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला पाणी पट्टीच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च होत असल्याने पाणी पुरवठा विभागाने पाणी पट्टीत दुप्पटवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवला जाणार आहे. त्यामुळे स्थायी समिती शुक्रवारी,दि.17 काय निर्णय घेणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिका हद्दीत 60 हजाराहूंन अधिक नळ कनेक्शन असून त्यांच्याकडून घरगुतीसाठी 1 हजार 500 रुपये तर व्यावसायीक कनेक्शन 10 हजार रुपये आकरले जाते. त्यामध्ये पाईपलाईनची दुरुस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने उत्पन्नापेक्षा दुप्पट खर्च होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी पट्टीत दुप्पट वाढीचा प्रस्ताव तयार केला असून, ना नफा ना तोटा या धरतीवर उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महापालिका हद्दीत पाणी पुरवठा विभाचे चार उपविभागीय कार्यालय आहेत. त्यामध्ये सावडी-बोल्हेगाव, शहर विभाग, झेंडीगेट विभाग, बुरुडगाव-केडगाव असे विभाग आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या 1 हजार 500 रुपये पाणी पट्टी ही आता 3 हजार रुपये केली जाणार आहे. आज महानगरपालिकेत स्थायी समितीची बैठक होत असून यात होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.