कात्रज-स्वारगेट ‘बीआरटी’ मार्ग सुरू होणार?

 अधिकाऱ्यांनी केली पाहणी : त्रुटी दूर करणार

पुणे – गेल्या दोन वर्षांपासून कात्रज-स्वारगेट “बीआरटी’ मार्गाचे बंद असलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. या मार्गाची पीएमपी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे. बीआरटी मार्गावरील सर्व त्रुटी लवकरात-लवकर सोडवून मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी पीएमपीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, “बीआरटी’चे प्रमुख अनंत वाघमारे, महापालिका पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, अभियंता विजय शिंदे आदी उपस्थित होते.

पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद सेवा मिळण्यासाठी “बीआरटी’ मार्ग तयार करण्यात आले. मात्र, काही “बीआरटी’ मार्ग ढिसाळ नियोजनामुळे बंद आहेत. 2018 मध्ये कात्रज-स्वारगेट मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्या मार्गात काही त्रुटी राहिल्याने हा मार्ग सुरू करण्यात आला नाही. अनेक बसेसना एकाच दिशेला दरवाजा असल्याने बीआरटी मार्गातील संचलन बंद केले. यामुळे बीआरटी मार्गाकडे प्रशासनाने लक्ष नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसून येते.

नयना गुंडे म्हणाल्या, “या “बीआरटी’ मार्गात काही पायाभूत सुविधांची कमी असल्याने नवीन बस संचलन करू शकत नाही. पायाभूत सुविधासाठी महापालिकेच्या पथ विभागालाही पत्र पाठवण्यात आले आहे. जानेवारीच्या महिना अखेरीस “बीआरटी’ मार्ग सुरू होईल.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.